रघुनाथ धोंडो कर्वे
एक अग्रगण्य समाजसुधारक
Raghunath Dhondo Karve
A social reformer
रघुनाथ धोंडो कर्वे हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य समाजसुधारक होते. ते महर्षी कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र असून त्यांचा जन्म १८८२ साली झाला. महर्षी कर्व्यांनी स्त्रीशिक्षणाचे मोठे कार्य उभे केले तसेच विधवा पुनर्विवाहाची चळवळदेखील चालवली. रघुनाथ कर्वे यांनी आपल्या वडिलांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवला. ते विलक्षण बुद्धिवादी आणि विज्ञाननिष्ठ होते. मुळात स्वतः गणिताचे प्राध्यापक असूनही नंतर त्यांनी संततिनियमन आणि कामशास्त्र या विषयांचा खोलवर अभ्यास केला. पुढे त्यासाठी प्रचारकार्यात उतरून त्यांनी समाजातील एका महत्त्वाच्या परंतु दुर्लक्षित विषयाला हात घातला. लोकांना या विषयाची शास्त्रशुद्ध माहिती व्हावी म्हणून त्यांनी ‘संततिनियमन’ आणि ‘गुप्तरोगापासून बचाव’ ही पुस्तके लिहिली. त्यानंतर लोकशिक्षण आणि प्रबोधन या हेतूने ‘समाजस्वास्थ्य’ नावाचे मासिक काढले. जुलै १९२७ मध्ये ‘समाजस्वास्थ्या’चा पहिला अंक निघाला. या अंकात हे मासिक सुरू करण्यामागचा आपला उद्देश रघुनाथरावांनी सांगितला आहे. ‘व्यक्तींच्या व समाजाच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची व त्यासंबंधी उपायांची चर्चा करणे हा या मासिकाचा उद्देश आहे. विशेषतः ज्या विषयासंबंधी लेख इतर पत्रकार छापत नाहीत असे विषय कितीही महत्त्वाचे असले तरी त्यासंबंधी माहिती मिळवण्यास सामान्य वाचकांस अतिशय अडचण पडते. ही अडचण दूर करण्याचा आमचा विचार आहे. यात तत्त्वज्ञानाचा खल न करता व्यवहारोपयोगी माहितीही दिली जाईल.’ २६ वर्षे ४ महिने एवढा दीर्घकाळ चालून अखेर १९५३ साली त्यांच्या मृत्यूनंतर हे मासिक बंद पडले.
Raghunath Dhondo Karve was a prominent social reformer in Maharashtra. Born in 1882, he was the eldest son of Maharshi Karve. Maharshi Karve devoted his life for the cause of women’s education and also led the widow remarriage movement. Raghunath Karve carried on his father’s legacy of social work. He was an extraordinary intellectual and had a scientific approach. Though initially a mathematics professor, later he started studying the subject of contraception and Kamashastra (Sexology) in depth. He devoted himself for the campaign of birth control and sexual freedom touching on an important but neglected subject in the society. He authored two books – ‘Contraception’ and ‘Prevention of Sexually Transmitted Diseases’, so that people would get the scientific knowledge about these subjects. After that, he started a magazine called ‘Samajaswasthya’ for the purpose of public education and awareness. The first issue of ‘Samajaswasthya’ was published in July 1927. In this issue, Raghunathrao has stated his intention behind starting the magazine – ‘The aim of this magazine is to discuss the physical and mental health of individuals and society and related remedies. However important some subjects are, other journalists do not cover those in their writing. So, the common man finds it very difficult to get information on such topics. We want to overcome this problem. It will not just have philosophical discussions, but also provides practical information about the subject.’ After a long period of 26 years and 4 months, the magazine finally closed down after his death in 1953.
Designed by Nimble esolutions | Copyright @Maharashtra Foundation